यावलला जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट


गणेशोत्सवासह मोहरम सणानिमित्त कार्यक्रमांची जाणली माहिती

यावल : यावल पोलिस ठाण्याला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सोमवारी भेट देत गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त होणार्‍या कार्यक्रमांचा आढावा घेतला. यावल शहरासह परीसरात बुधवार, 26 ऑगस्ट या दिवशी श्रींचे विसर्जन होणार असून 30 ऑगस्ट रोजी मुस्लीम बांधवांचे मोहरमचा ताजिया 3 सप्टेंबर रोजी राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या जश्‍ने ए पेहरननिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकीचा आढावा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतला. प्रसंगी प्रभारी निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलिस उपनिरीक्षक विनोद रवांडबहाले, पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांची उपस्थिती होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाच्या नियमांची पालनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच कायदा सुव्यवस्थेसंदर्भात त्यांनी अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !