रेल्वे प्रवासात मोबाईल चोरी : राहुरीचा चोरटा जाळ्यात


भुसावळ : पुणे-दानापूर रेल्वे प्रवासादरम्यान चोरट्याने प्रवाशाचा 13 हजार 999 रुपयांचा मोबाईल लांबवण्यात आला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोपनीय माहितीवरून संशयीत आरोपी किशोर मोहन मोरे (राहुरी) याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त केला आहे. तक्रारदार राजू मोरे (पुणे) हे पुणे-दानापूर प्रवास करीत असताना चोरट्याने मोबाईल लांबवला होता. अहमदनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो भुसावळात वर्ग करण्यात आला होता. लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर नाव्हकर, हवालदार पाटील, हवालदार धांडे आदींनी आरोपीला अटक केली. तपास हवालदार शैलेश पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !