ज्ञानेश्‍वरी एक्स्प्रेसमधून मोबाईल लांबवला : आरोपी जाळ्यात


भुसावळ : अप ज्ञानेश्‍वरी एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशाचा मोबाईल लांबवणार्‍या चोरट्याच्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. प्रसाद भागवत चौधरी (19, चौगुली प्लॉट, कांचन नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदार मोहम्मद नूरउद्दीन उमर शेख (35, कोलकत्ता) हे 24 जानेवारी रोजी अप ज्ञानेश्‍वरी एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 4 मधून हावडा ते मुंबई प्रवास करीत असताना जळगाव स्थानक येण्यापूर्वी गाडी थांबली असताना चोरट्याने 26 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी 8 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी प्रसाद चौधरी यास 23 रोजी अटक करण्यात आली. ही कारवाई लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मधुकर न्हावकर, हवालदार अजित तडवी, नाईक सतीश जवंजाळ यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !