प्रेरणा एक्स्प्रेसमधून महिलेची पर्स लंपास : जळगावातील आरोपीला अटक


भुसावळ : अप प्रेरणा एक्स्प्रेने सुरत ते बडनेरा प्रवास करणार्‍या महिला प्रवाशाची जळगाव रेल्वे स्थानक येण्यापूर्वी चोरट्याने पर्स लांबवली होती. पर्समध्ये दोन मोबाईलसह 32 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जळगावातील आरोपीला अटक करण्यात आली. इरफान हैदर खान (31, रूम नंबर 21, बिल्डींग 24, गेंदालाल मिल, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदार प्रभाकर श्रीराम दवाडे (62, लिंबायत, सुरत) हे अप प्रेरणा एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस- 3 मधून सुनेसह सुरत ते बडनेरा असा प्रवास करीत असताना त्यांच्या सुनेच्या डोक्याखाली असलेली पर्स चोरट्याने लांबवली होती व या प्रकरणी 1 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक कोळी, कॉन्स्टेबल स्नेहा अडकिणे, हवालदार रामकृष्ण खंडागळे यांनी आरोपीला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला असून आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !