रावेर पंचायत समिती उपसभापतीपदी जुम्मा तडवी बिनविरोध
रावेर : रावेर पंचायत समितीच्या उपसभापती जुम्मा तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पी.के.महाजन यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने रीक्त झालेल्या जागी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी यांचा उपसभापती पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज अल्याने निवडणूक निर्णय अधिकारी उषाराणी देवगुणे यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.
यांची होती सभेलेा उपस्थिती
विशेष घेण्यात आलेल्या सभेला सभापती जितेंद्र पाटील, सदस्य पी.के.महाजन, योगेश पाटील, दीपक पाटील, कविता कोळी, माधुरी नेमाडे, धनश्री सावळे, प्रतिभा बोरोवले, योगीता वानखेडे, रुपाली कोळी आदी उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यानी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी खासदार रक्षा खडसे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी उपसभापती सुनील पाटील, सी.एस.पाटील, गोपाळ नेमाडे, कैलास सरोदे, शिवाजीराव पाटील, संदीप सावळे, हरलाल कोळी आदींनी अभिनंदन केले.


