जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 604 रुग्ण आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 23 हजार 527 वर : 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 604 कोरोनाबाधीत आढळल्याने खळबळ उडाली असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 23 हजार 527 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 752 झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात 16 हजार 599 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 116
जळगाव ग्रामीण 61
भुसावळ 54
अमळनेर 61
चोपडा 63
पाचोरा 43
भडगाव 19
धरणगाव 41
यावल 13
एरंडोल 23
जामनेर 30
रावेर 22
पारोळा 18
चाळीसगाव 20
मुक्ताईनगर 14
बोदवड 02
अन्य जिल्हा 04




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !