जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 456 रुग्ण आढळले
24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 813 रुग्णांचे मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे तब्बल 456 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 591 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 19 हजार 736 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत 813 रुग्णांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 129
जळगाव ग्रामीण 06
भुसावळ 56
अमळनेर 36
चोपडा 30
पाचोरा 03
भडगाव 47
धरणगाव 02
यावल 10
एरंडोल 19
जामनेर 31
रावेर 22
पारोळा 31
चाळीसगाव 28
मुक्ताईनगर 00
बोदवड 02
अन्य जिल्हा 04


