नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी प्रभाग 24 मध्ये स्वखर्चाने टाकला मुरूम


भुसावळ : अमृत योजनेच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनी व सतत पडणार्‍या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची संपूर्णत: दुरवस्था झाली असून प्रभाग 24 चे राष्ट्रवादीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी स्वखर्चाने प्रभागामध्ये खड्डे बुजविण्यासाठी 20 डंपर मुरूम टाकल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरीक त्रस्त असून त्याचा रोष नगरसेवकांवर प्रभागातील नागरीक काढत आहेत.

आणखी 30 डंपर मुरूम टाकणार
प्रभाग 24 चे नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार्यातून व मार्गदर्शनाखाली तब्बल 20 डंपर मुरूम प्रभागातील नारायण नगर, महेशनगर, हिरानगर, कला नगर, तुकाराम नगर या भागात टाकला असून संपूर्ण प्रभाग खड्डेमुक्त व चिखल मुक्त करण्यासाठी 30 डंपर अजून टाकण्यात येणार असल्याची माहिती दुर्गेश ठाकूर यांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !