भरधाव 407 दुचाकीवर धडकल्याने एकाचा मृत्यू
साकळी गावाजवळ अपघात : मयत जळगावातील पिंप्राळ्याचे रहिवासी
यावल : भरधाव 407 ने दुचाकीला धडक दिल्याने मुकेश लोटन सोनार (52, रा.पिंप्राळा, मयुरनगर जळगाव) यांचा मृत्यू झाला. सोमवारी
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास साकळी गावाजवळ हा अपघात घडला. या प्रकरणी मालवाहू वाहन चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले
रुपेश बळीराम सोनार (36, रेणुका नगर, मेहरुण, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार ते व मुकेश लोटन सोनार हे सोमवारी दुचाकी (क्रमांक एम. एच.19 सी.क्यु.2989) व्दारेे यावलकडे येत असताना दरम्यान यावल – चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाट्याजवळ साकळीकडून चोपड्याकडे जाणार्या मालवाहू 407 वाहन (एम.एच.19 -4100) या वाहनावरील चालक सलीम अब्दुल्ला शेख (रा.साकळी) यांनी भरधाव वेगात अविचाराने फिर्यादीच्या दुचाकीस समोरून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार मुकेश सोनार जागेवरचं ठार झाले तर मागे बसलेले रुपेश सोनार हे जखमी झाले.जखमी व मयत यास आदिवासी तडवी भिल्ल रूग्णवाहिकेव्दारे यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दुपारी मयत मुकेश सोनार यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह मयताच्या नातेवाईकांना सोपवला. या प्रकरणी यावल पोलिसात 407 चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार संजय देवरे करीत आहे.


