भुसावळातील खून प्रकरण : शस्त्र देणारा पाचवा आरोपी जाळ्यात


भुसावळ : शहरातील श्रीराम नगरातील तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. या प्रकरणातील चार आरोंपींपैकी दोघांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. या खून प्रकरणात शस्त्र पुरवठा करणार्‍या एकास पोलिसांनी अटक केली असून आता या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. सिव्हील इंजिनिअर विलास दिनकर चौधरी या तरुणावर चाकूहल्ला व गोळीबार करुन निघृण खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी अक्षय प्रकाश न्हावकर (वय 23 रा. चक्रधर नगर भुसावळ), अभिषेक राजेश शर्मा (वय 21 रा. चमेली नगर भुसावळ) व आकाश गणेश पाटील (वय 21 रा. नारायण नगर भुसावळ), मयुरेश राजेश महाजन (वय 20 रा. दत्तनगर भुसावळ ) यांना अटक करण्यात आली असून त्यांना 2 ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान खून प्रकरणात वापरण्यात आलेल्या हत्याराचा पुरवठादार असलेल्या विशाल टाक (22, रा.वाल्मिक नगर) या पाचव्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. फायरींग नंतर बुलेटची कॅपचा शोधही पोलिसांनी सुरु केला आहे. तर आरोपींच्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याचीही माहितीही सुत्रांनी दिली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !