जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 541 रुग्ण आढळले
24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 28 हजार 132 रुग्णांना कोरोनाची लागण
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 541 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 28 हजार 132 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 20 हजार 268 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत 822 रुग्णांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 117
जळगाव ग्रामीण 29
भुसावळ 35
अमळनेर 90
चोपडा 57
पाचोरा 08
भडगाव 11
धरणगाव 33
यावल 10
एरंडोल 31
जामनेर 57
रावेर 05
पारोळा 24
चाळीसगाव 06
मुक्ताईनगर 12
बोदवड 11
अन्य जिल्हा 05


