बोदवडमध्ये ओमनीला आग : अनर्थ टळला


बोदवड : साळशिंगीकडून बोदवडकडे येणारी ओमनी मंगळवारी अचानक पेटल्याने खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. साळशिंगीकडून बोदवडकडे येणारी मारूती ओमनी शहरातील शारदा कॉलनीजवळ आली अचानक पेटली. वाहनाला आग लागल्याचे कळताच चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवत बाहेर उडी घेतली. परीसरातील नागरीकांनी धाव घेत आग विझवली. संबंधीत ओमनी कार ही गॅसवर चालणारी असल्याने आगीमुळे स्फोट झाला असता तर परीसरात हानी होण्याची शक्यता होती मात्र नागरीकांनी तातडीने आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !