रावेरात साश्रू नयनांनी विघ्नहर्त्याला निरोप


रावेर : शहरातील गणेश भक्तांनी मोठ्या शांततेत भक्ती भावाने गणरायाला निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच नगर पालिकेने सार्वजनिक व खाजगी श्री गणेशाच्या मूर्तीचे संकलन करून विधीवत तापी नदीत विसर्जन केले. रावेर शहरातील 11 सार्वजनिक व 9 खाजगी व ग्रामीण भागातील 11 सार्वजनिक व 11 खाजगी असे एकूण 41 श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त
याप्रसंगी अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी आरएपी प्लाटून दर्जाचे 2 अधिकारी व 80 जवान, एसआरपीएफ प्लाटूनचे 25 होमगार्ड 87, आरसीपी 27, रावेर पोलीस चार अधिकारी तसेच 35 कर्मचारी असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरपालिकेतर्फे चार आयशर वाहन, अंबिका व्यायाम शाळेकडून एक ट्रॅक्टर, नगरसेवक राजू रामदास महाजन यांच्याकडून एक ट्रॅक्टर असे गणपती मूर्ती संकलनासाठी ठेवण्यात आले होते. तहसीलदार उषाराणी देवगुणे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या प्रयत्नांतून शांततेत गणेश विसर्जन झाल. अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याहस्ते रावेर आठवडे बाजारात संकलन केलेल्या गणपती मूर्तीची आरती करण्यात आली व त्यानंतर सर्व वाहने निंभोरासीम तापी नदी पुलाकडे विसर्जन करीत रवाना होऊन भक्तीभावात सर्व मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !