वरणगावातील तीर्थक्षेत्र अमर हनुमान मंदिराच्या कामाला लोकसहभागातून सुरवात


वरणगाव : वरणगाव शहरातील प्राचीन अमर हनुमान मंदिराच्या कामाला लोकसहभागातून नुकतीच सुरुवात झाली. अतिपावसामुळे हे मंदिर पडल्याने भाविकांनी पुन्हा मंदिर उभे राहण्यासाठी पुढाकार घेतला होता. वरणगावचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्याहस्ते कुदळ मारून कामाला सुरूवात करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, मुख्याधिकारी शामकुमार गोसावी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, बजरंग दलाचे उपजिल्हाप्रमुख नितीन शिंपी, ललित पटेल, राजु खडसे, गजानन वंजारी, योगेश माळी, दीपक धनगर, पप्पू पहेलवान, राजेश चौधरी, पत्रकार विजय वाघ, आकाश निमकर, सुनील दादा, प्रभाकर माळी, जग्गु माळी, वसंत माळी, राम माळी, बाळू माळी यांची उपस्थिती होती. श्री अवधूत मुजुमदार महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्या आली. हनुमान भक्तांनी मंदिराच्या कामासाठी मदत करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील काळे, राजू खडसे, गजानन वंजारी (काळे) योगेश माळी, दीपक धनगर, पप्पू पेहलवान, राजेश चौधरी यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !