भुसावळातील भोळे महाविद्यालयात राज्यस्तरीय वेबिनार


भुसावळ : शहरातील दि भुसावळ पीपल्स चॅरीटेबल संस्थेच्या दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राज्यशास्त्र, इतिहास, भुगोल विभाग अंतर्गत कोविड 19 आणि बदलते संदर्भ – ऐतिहासिक, भूगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक या विषयावर नुकताच राज्यस्तरीय वेबिनार झाले. उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.प्रमोद पवार यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आले.

यांचा ऑनलाईन सहभाग
अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे व्यवस्थापन परीषद व सिनेट सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक उपस्थित होते. प्राचार्य डॉ.प्रमोद पावार यांनी कोविड 19 मुळे विविध क्षेत्रात झालेले बदल यावर गोषवारा सादर केला. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी कोविडं 19 च्या संसर्गजन्य रोगापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.

तीन सत्रात मार्गदर्शन
तीन मार्गदर्शन सत्रात साक्रीच्या सी.गो.पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.पी.डी.देवरे यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक,व शैक्षणिक या विषयावर बदलते संदर्भ या विषयावर तर शेंदूर्णी येथील प्रा.डॉ.प्रशांत देशमुख यांनी कोविडं 19 आणि महामारीचा इतिहास व ऐतिहासिक पर्यावरणावर होणारा परीणाम तर डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.जे.डी.लेकुरवाळे यांनी कोविडं 19 आणि भौगोलिक परीस्थिती, बदलत्या पर्यावरणावर ऐतिहासिक विविध पुरावे देत सखोल मार्गदर्शन केले. भविष्य काळातील येणार्‍या संकटांचा वेध घेण्यासंदर्भात उपाययोजना सूचवली. प्रा.डॉ.शुभांगी राठी (भुसावळ), प्रा.डॉ.प्रेमसागर (मुक्ताईनगर), प्रा.पी.पी.लढे (मुक्ताईनगर) यांनी सत्र अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
वेबिनारचे प्रास्ताविक प्रा.डॉ.शोभा चौधरी तर सूत्रसंचालन आयोजन सचिव प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी तर पाहुण्यांचा परीचय प्रा.अंजली पाटील यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रा.राजेंद्र भोळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी तांत्रिक साहाय्य गिरीश कोळी, दीपक जैस्वार यांनी केले असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !