तुरटीच्या गणपतीमुळे नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येते
वरणगावचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे
वरणगाव : वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या निवासस्थानी पर्यावरणाचा समतोल साधला जावा यासाठी शाडूचा तर जनसंपर्क कार्यलयात तुरटीचा गणपती बसवण्यात आला होता. दहाव्या दिवशी शाडूच्या गणपतीचे वडील रमेश काळे, आई रुख्मिनी काळे, पत्नी रुपाली काळे, प्रेम व आदेश यांच्याहस्ते निवासस्थानी घरीच करण्यात आले तर जनसंपर्क कार्यालयात सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, मुख्याधिकारी शामकुमार गोसावी, कामगार नेते मिलिंद मेढे यांच्या शुभहस्ते तुरटीच्या गणपतीचे विसर्जन पाण्याच्या पात्रात करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, प्रेम काळे, आदेश काळे, अॅड.गणपतराव जंजाळ, छोटू सेवातकर, सुनील माळी, शामराव धनगर, अजय पाटील, संजय जैन उपस्थित होते.

सकारात्मकता गरजेची : संदीपकुमार बोरसे
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पर्यावरणाचा समतोल राखला जावा तसेच स्वच्छ भारत अभियानात वरणगावचा देशात 23 वा नंबर आला पुढे सुद्धा राज्यात एक नंबरवर वरणगाव आण्यासाठी तुरटीचा गणपती बसवून हा एक आदर्श वरणगाव शहरात निर्माण केला. तुरटीचा गणपती बसविल्यामूळे मानवाच्या स्वभावातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता प्राप्त होते आणि सध्या आपल्याला पुढे जावयाचे असल्याने सकारात्मकता आणणे जरुरुचे असल्याचे मत सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी व्यक्त केले.
पुढील वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरीस हद्दपार करणार : मुख्याधिकारी
मुख्यधिकारी शामकुमार गोसावी म्हणाले की, पुढच्या वर्षी वरणगाव शहरात फक्त आणि फक्त तुरटी व शाडूच्या मातीतचेच गणपती मूर्ती बसवल्या जातील शिवाय प्लास्टर ऑफ प्यारीसला हद्दपार करू, असा आशावाद व्यक्त केला.

