न्यायालयाची फसवणूक : जळगावच्या महिला वकिलाविरुद्ध गुन्हा


यावल : यावल पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीचा जामीन करण्यासाठी बनावट दस्तावेजाचा आधार घेतल्याप्रकरणी जळगावच्या महिला वकिलाविरुद्ध सहाय्यक अधीक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या तक्रारीनुसार यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने वकील वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

न्यायालयाची केली फसवणूक
डांभूर्णी येथे 4 एप्रिलला 16 वर्षीय बालकाच्या हत्येप्रकरणी संशयीतास अटक केल्यानंतर पोलिस व नागरीकांमध्ये वाद झाला होता. यातील संशयीत घन:श्याम कोळी, कमलाकर कोळी, विजय कोळी यांना जामीन मिळण्यासाठी जळगाव येथील अ‍ॅड.राणू अग्रवाल यांनी भुसावळ येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज (नंबर 318/20 मधील आदेश 22 जून 2020) केला होता. तसेच त्यांनी शपथपत्रात नमूद करून लिहून दिले व संशयीतांचा जामीन करून घेतला. प्रत्यक्षात यावल न्यायालयाकडून जेव्हा भुसावळ न्यायालयाकडे जामीन अर्जाची पडताळणी झाली, त्यावेळी हा जामीन अर्ज अन्य गुन्ह्यातील संशयीत विकास उर्फ राजू भागवत सपकाळे याचा असल्याचे समोर आले. चौकशीअंती अ‍ॅड.अग्रवाल यांनी बनावट जामीन आदेश सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बुधवारी अ‍ॅड. अग्रवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी जिल्हा सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी हे बुधवारी रोजी येथील न्यायालयात आलेे होते. त्यांनी या कागदपत्रांची तपासणी केली, असे सरकारी वकील नितीन खरे यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !