माजी मंत्री खडसेंच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात रक्तदान शिबिर


भुसावळ : महाराष्ट्राचे लोकनेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी भुसावळ नगरपालिकेच्या नगरसेविका मेघा देवेंद्र वाणी व देवा सीताराम वाणी मित्र परीवारातर्फे 2 रोजी शहरातील श्री रीदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये धन्वंतरी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 38 दात्यांनी रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती
रक्तदान शिबिरास भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, युवराज लोणारी, पुरूषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, परीक्षीत बर्‍हाटे, गिरीश महाजन, अमोल इंगळे, शेखर इंगळे, अमोल महाजन, पवन बुंदेले, प्रमोद पाटील, रमाशंकर दुबे यांनी भेट दिली. शिबिर यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते देवा वाणी, शाम भारंबे, रूपेश चौधरी, नीलेश वाणी, भरत पांगले, चेतन शिरनामे, रोहित नेमाडे, धनंजय सोनार, मयूर सोनार, पवन शिंदे, सागर शिंदे, राहुल नेमाडे, मिनल वाणी, गणेश झोपे, विनय चौधरी, रोहन भोळे, नरेंद्र भडके आदींनी सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !