रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समितीच्या वतीने पुरस्कार जाहीर


आदर्श शाळा पुरस्कार तांदलवाडी माध्यमिक विद्यालयाला जाहीर

रावेर : रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समितीच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारे शाळा आणि शिक्षक पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहेत. तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार तांदलवाडी (ता.रावेर) येथील माध्यमिक विद्यालय या शाळेस जाहीर करण्यात आला असून त्यासोबतच पाच माध्यमिक शिक्षकांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत. निवड समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. त्यात तुळशीदास बाबुराव महाजन (उपमुख्याध्यापक- सरदार जी जी हायस्कूल, रावेर), प्रेमलता किशोर चौधरी (उपशिक्षिका- द.सो.पाटील माध्यमिक विद्यालय, केर्‍हाळा), अर्जुन जयराम सोळुंके (उपशिक्षक- श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूल, विवरा), लक्ष्मण मधुकर ठाकूर (उपशिक्षक,- नूतन माध्यमिक विद्यालय, चिनावल), अजीम खान रशीद खान (उपशिक्षक, खिजर उर्दू हायस्कूल, चिनावल) या शिक्षकांची निवड आलेल्या प्रस्तावांतून करण्यात आली. तालुक्यातील माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन ही गौरव समिती स्थापन केली आहे. गेल्या सोळा वर्षापासून ही समिती शाळा आणि शिक्षकांना पुरस्कार प्रदान करते. जिल्हा परीषदेने माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना पुरस्कार देणे बंद केल्यापासून ही समिती पुरस्कार जाहीर करून प्रदान करते. मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन दिले जाणारे अशा प्रकारचे पुरस्कार हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात योग्यवेळी पुरस्कार प्रदान केले जातील, असे संयोजकांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !