गोवा एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट


भुसावळ : कोकण रेल्वेद्वारा काही गाड्यांच्या मार्गात परीवर्तन करण्यात आले आहे. अप 02780 हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही प्रस्थान स्टेशनपासून 10 ते 15 सप्टेंबरपर्यंत हुबळी स्थानकापर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. ही गाडी लोंडा ते मडगावपर्यंत रद्द करण्यात आली आहे. डाऊन 02779 मडगाव-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही गाडी 10 ते 15 सप्टेंबरपर्यंत हुबळी स्टेशनवरून सुटल्यानंतर मडगाव व लोंडा दरम्यान रद्द करण्यात आली असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !