जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 911 रुग्ण आढळले
24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 31 हजार 660 रुग्णांना कोरोनाची लागण
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे तब्बल 911 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 31 हजार 660 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 22 हजार 363 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत 857 रुग्णांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 240
जळगाव ग्रामीण 41
भुसावळ 54
अमळनेर 102
चोपडा 82
पाचोरा 44
भडगाव 10
धरणगाव 08
यावल 13
एरंडोल 69
जामनेर 63
रावेर 54
पारोळा 43
चाळीसगाव 65
मुक्ताईनगर 04
बोदवड 10
अन्य जिल्हा 09


