वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी विनोद सोनवणे
भुसावळ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली असून जिल्हाध्यक्षपदी विनोद सोनवणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. रावेर लोकसभा क्षेत्रात पक्षाची संघटनात्मक बांधणी व गाव तेथे शाखा स्थापन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी सक्रिय कार्य करून वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात घेऊन त्यांची जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करून जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.
अशी आहे नूतन कार्यकारीणी
जिल्हाध्यक्ष- विनोद सोनवणे (भुसावळ), उपाध्यक्ष- रफिक बेग रशीद बेग (रावेर), कलंदर बशीर तडवी (रावेर), महेंद्र चैत्राम सुरडकर (बोदवड), महासचिव- दिनेश रामदास इखारे (भुसावळ), विनोद पाडर (बोदवड), मनोज रामदास काकडे (यावल), सचिव- दीपक वसंत मेघे (यावल), संजय आत्माराम सुरडकर (भुसावळ), कोषाध्यक्ष- अरुण रामभाऊ नरवाडे (भुसावळ), प्रवक्ता- अॅड.विनोद इंगळे (मुक्ताईनगर), आयटी सेल प्रमुख- सचिन कडू बार्हे (यावल), जिल्हा कार्यकारीणी सदस्य- शे.सलीम शे.खलील (बोदवड), अरुण चंद्रभान तायडे (भुसावळ), धोंडू मांगु वाघ (भुसावळ), भिकाजी श्रीराम असलकर (मुक्ताईनगर), सुनील पाटील (भुसावळ), रामचंद्र सुरेश साळुंखे (भुसावळ), सुनील भागवत चौधरी (भुसावळ), जमीर उद्दीन शमशोद्दीन (बोदवड), संतोष बोदडे (मुक्ताईनगर).सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले असून जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीचे गण, जिल्हा परीषदेचे गट या स्वरूपात पक्षाची भक्कम बांधणी करण्याचा मनोदय विनोद सोनवणे यांनी कार्यकर्त्यांची बोलताना व्यक्त केला.


