रुक्मिणी फाउंडेशन 22 शिक्षकांना गुरुरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करणार
राष्ट्रीय दुखवटा संपल्यानंतर कार्यक्रमाचे आयोजन : माजी नगराध्यक्ष सुनील काळे
वरणगाव : शहरातील रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्या शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात गुरुरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानीत करण्यात येते. यानुसार यावर्षी 22 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा संपल्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती रुक्मिणी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.
यांचा होणार सन्मान
यामध्ये महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.ए.वाघ, डॉ.बी.एम.पाटील, हरी कीटकूल बढे माध्यमिक विद्यालय पिंपळगाव खुर्दच्या मुख्याध्यापिका उषा रडे, नेहरू माध्यमिक विद्यालय तळवेलचे पर्यवेक्षक सुरेश अहिरे, सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका संगीता चौधरी, गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयाचे अविनाश देशमुख, दिनकर निंबोळकर, फक्रुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल, वरणगावचे हबीब खान हमीद खान, रुणोदय माध्यमिक विद्यालय, बोहर्डी खुर्दचे शैलेश नेहेते, माध्यमिक विद्यालय वझररखेडेचे प्रताप घोगरे, शास्त्री विद्यालय पिंपळगाव बुद्रुकचे पंकज माळी, वरणगाव जि.प.केंद्र शाळेचे मालती मराठे, वरणगाव जि.पमराठी कन्या शाळेचे राकेश कुलकर्णी, सिद्धेश्वरनगर जि.प.मराठी शाळेच्या आशा निंबाळकर, वरणगाव जि.प.उर्दू मुलांची शाळेच्या सबीना समद खाटीक, वरणगाव जि.प.उर्दू कन्या शाळेचे जावेद अहमद इफ्तेखान अहमद, तळवेल जि.प.मराठी मुलांची शाळेच्या अरुणा भास्कर पाटील, तपतकठोरा जि.प.मराठी शाळेचे अनिल बळीराम दांडगे, करंजी पाचदेवळी जि.प.मराठी शाळेच्या सुवर्णलता तायडे, मनुर बुद्रुक जि.प.मराठी शाळेचे सुरेश सुरवाडे, तामसवाडी जि.प.मराठी शाळेचे राजेंद्र देवराम तायडे, वरणगावच्या च.ह.बढे प्राथमिक शाळेच्या शिल्पा चौधरी या शिक्षकांचा सन्मान लवकरच केला जाणार असल्याची माहिती रुक्मिणी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.


