सामाजिक बांधीलकी : शिक्षण सभापती मुकेश पाटील यांनी 275 शिक्षकांचा केला सन्मान


भुसावळ : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले भुसावळातील भाजपाचे नगरसेवक तथा शिक्षण सभापती मुकेश नरेंद्र पाटील यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहर व तालुक्यातील जि.प.प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेत ज्ञानार्जन करणार्‍या तसेच सेवानिवृत्त मिळून 275 शिक्षकांचा ट्रॉफी देवून सन्मान केला. गेल्या चार वर्षांपासून प्रभाग सातचे नगरसेवक मुकेश पाटील हे स्व.नारायण पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचा दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान करतात मात्र कोरोना महामारीमुळे यंदा कार्यक्रमाचे आयोजन शक्य नसलेतरी शिक्षकांच्या घरी जावून सोशल डिस्टन्सचे पालन करीत त्यांनी शिक्षकांचा ट्रॉफी देवून त्यांचा सन्मान करीत आशीर्वाद घेत गुरुंप्रती आभार मानले.

मुकेश पाटील हे तर सजग लोकप्रतिनिधी : प्रा.संजय चौधरी
एक उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास मुकेश पाटील यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येते. दरवर्षी शिक्षक दिनी त्यांच्यातर्फे शिक्षकांचा सन्मान केला जातो मात्र यंदा कोरोना महामारीमुळे कार्यक्रम घेणे शक्य झाला नसलातरी प्रत्येक शिक्षकांच्या घरोघरी जावून त्यांनी शिक्षकांचा केलेला सन्मान हा निश्‍चितच कौतुकास्पद आहे. प्रभागातील नागरीकांसह शिक्षकांनी सांगितलेली कामे, अडी-अडचणी नेहमीच मुकेश पाटील सोडवत असल्याचे भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाचे क्रीडा विभागाचे प्रा.संजय चौधरी यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !