अमळनेरला 196 तर जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 773 रुग्ण आढळले
24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 32 हजार 433 रुग्णांना कोरोनाची लागण
जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल 773 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 32 हजार 433 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 22 हजार 826 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत 870 रुग्णांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 43
जळगाव ग्रामीण 05
भुसावळ 68
अमळनेर 196
चोपडा 69
पाचोरा 74
भडगाव 16
धरणगाव 29
यावल 38
एरंडोल 36
जामनेर 46
रावेर 75
पारोळा 36
चाळीसगाव 25
मुक्ताईनगर 06
बोदवड 10
अन्य जिल्हा 01


