जळगावात पिस्तुलाच्या धाकावर दहशत : लिंबू राक्याला अटक


जळगाव : मैं हू डॉन, अभी सबको दिखाता हू लिंबू राक्या क्या चीज है, असे म्हणत हातातील गावठी बनावटीची पिस्तूल फिरवून शहरातील बहिणाबाई गार्डनजवळ दशहत माजविणार्‍या पोलिसांच्या रेकॉर्डवरील राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या (रा.कांचनगर) याला मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून 10 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहिणाबाई उद्यानासमोर माजवित होता दहशत
शनीपेठ हद्दीतील राकेश चंद्रकांत साळुंखे उर्फ लिंबु राक्या (24, रा. कांचन नगर) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी लिंबू राक्या शहरातील बहिणाबाई उद्यान परीसरात बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीची पिस्तूल घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली. त्यानुसार बापू रोहम यांनी पोलिस नाईक विजय शामराव पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन यांचे पथक रवाना केले. पथकाने उद्यान परीसरात शोध घेतला असता, बहिणाबाई उद्यानाच्या प्रवेशाव्दारासमोर सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास लिंबू राक्या हा… हातात पिस्तूल घेवून ती फिरवून , येणार्‍या जाणार्‍या लोकांना मै हू डॉन, अभी सबको दिखाता हू लिंबू राक्या क्या चिज है, असे म्हणून दहशत माजवित होता. पथकाने त्याला त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील 10 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !