मुक्ताईनगरात उद्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ पुस्तकाचे प्रकाशन
माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या आयुष्यातील लोकांना माहिती नसलेल्या अनेक बाबींचा होणार उलगडा : प्रा.सुनील नेवे
भुसावळ : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या प्रा.सुनील नेवे लिखीत पुस्तकाचे गुरुवार, 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मुक्ताईनगरातील खडसे खडसे फार्म हाऊसवर निवड मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करून प्रकाशन करण्यात येणार आहे.
यांची राहणार उपस्थिती
या कार्यक्रमास माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, प्रभाकर शास्त्री महाराज, साहित्यीक व.पु.होले, जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, जि.प.सभापती, माजी आमदार व नगरध्यक्ष भाजपा पदाधिकारी आदींची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर आदी मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

हा ग्रंथ दीपस्तंभ ठरणार : प्रा.सुनील नेवे
भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्या याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, 219 पानांचे पुस्तक असून माजी प्राचार्य डॉ.ई.डी.देवरे यांनी या पुस्तकाची प्रस्तावली दिली आहे. या पुस्तकातून नाथाभाऊंच्या आयुष्यातील लोकांना न माहिती असलेल्या बाबी नागरीकांना कळणार आहे
शिवाय पुढील अनेक वर्ष नव्याने राजकीय नेतृत्व करणार्यांसाठी हा ग्रंथ दीपस्तंभ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, हा गौरव ग्रंथ नाही, वस्तुनिष्ठ तटस्थपणे केलेले मूल्यमापन असून खडसेंच्या बालपणातील गंमतीदार गोष्टी यातून कळणार आहेत.

