गावठी कट्ट्यासह दोघे आरोपी तालुका पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : भुसावळ तालुका पोलिसांनी वराडसीम गावातून गोपनीय माहितीच्या आधारे दोघा आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे. राजेश रमेश तायडे (27, पाडळसे, ह.मु.असोदा) व सचिन संतोष सपकाळे (26, वराडसीम) असे अटकेतील आरोपींची नाव आहेत. बुधवारी दुपारी 2.20 वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईने वराडसीम गावात खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, युनूस इब्राहिम शेख, युनूस मुसा शेख, विठ्ठल फुसे, राजेंद्र पवार, संजय मोंढे, इशान तडवी, होमगार्ड जगदीश पाटील यांनी केली.


