अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 18 सप्टेंबरपासून ऑनलाईन होणार
जळगाव : शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या 110 व्या अ.भा.व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक हे कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा ही 18 ते 22 सप्टेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याची माहिती आर.पी.पगारे, अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी दिली आहे. ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे व त्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरला असून बीटीआरआय केंद्रात परीक्षा फी जमा केली आहे. अशा सर्व पात्र उमेदवारांनी याची नोंद घेण्याचे आवाहनही पगारे यांनी केले आहे.

