भुसावळ जंक्शनवर विभागातील पहिलेच भव्य प्रतीक्षालय
ऑनलाईन उद्घाटन : 140 प्रवासी बसू शकणार
भुसावळ : भुसावळातील 47 अंशापर्यत पोहोचणार्या तापमानामुळे येथील रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना होणारा असाहय उकाडा सुसाह्य करण्यासाठी रेल्वे
प्रशासनाने रेल्वे स्थानकावर अद्यावत एसी यंत्रणेने सुसज्ज असलेल्या प्रतिक्षालयाचे लोकार्पण शुक्रवारी डीआरएम यांच्या हस्ते झाले. यामुळे उन्हाळ्यात आता प्रवाशांना एसीच्या थंड वातावरणात गाडीची प्रतिक्षा करता येणार आहे. एका वेळी 140 प्रवासी बसण्याची प्रतीक्षालयाची क्षमता आहे. भारतीय रेल्वेची आधुनिकतेकडेवाटचाल सुरू आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सुध्दा प्रवाशांसाठी अत्याधुनिक वातानुकूलीत प्रतिक्षालय हवे असा प्रस्ताव डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी व्यक्त केला होता त्यामुळे भुसावळ जंक्शनवरील प्लॅटफॉर्म चारवर (जुना दोन) आरएमएस कार्यालयाची जागा मोकळी झाल्यावर त्याच जागेच नवीन अद्यावत प्रतिक्षालयाचे नियोजन करून तब्बल वर्षभरात अद्यावत प्रतिक्षालय नावारूपाला आहे. प्लॅटफॉर्म चारवर अद्यावत नवीन प्रतिक्षालयाचे काम पूर्ण झाल्यावर डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. डीआरएम गुप्ता यांनी त्यांच्या दालनात बसूनच हे उद्घाटन केले.
प्रवाशांना मोठा दिलासा
भुसावळ जंक्शनवर 24 तासात 10 हजार प्रवाशांची ये जा होत असते. भुसावळ येथे उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ होत असते. त्यामुळे प्रवासी घामाघुम होत असतात. भुसावळ शहरातील तापमान अधीक असते. यामुळे भुसावळ जंक्शनवर नवीन अद्यावत वातानुकूलीत प्रतिक्षालयाची गरज होती, याचमुळे डीआरएम गुप्ता यांनी नियोजन करीत वातानुकलीत प्रतिक्षालय नव्याने करण्यात आले. गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या या प्रतिक्षालयाचे काम पूर्ण झाल्यावर शुक्रवारी याचे उदघाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कुठल्याही प्रकारची गर्दी न करता,फिजील डीस्टन्सिंग ठेवत प्रतिक्षालयाचे उदघाटन करण्यात आले. डीआरएम गुप्ता यांनी त्यांच्या
कार्यालयातून प्रतिक्षालयाचे उदघाटन केले. रेल्वे स्थानकावर स्टेशन डायरेक्टर जी.आर. अय्यर, स्टेशन व्यवस्थापक मनोज श्रीवास्तव, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, राजेद्र देशपांडे आदी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी तोंडाला मास्क लावून उपस्थित होते.

प्रतिक्षालयात लावले आठ एसी यंत्रे
रेल्वे स्थानकावर नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षालयात प्रवाशांच्या सेवेसाठी आठ एसी यंत्रे लावण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर असाहय होणारा उकाडा एसी यंत्रणेमुळे सुसाह्य होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाढणारे तापमानाचा फटका कमी बसणार आहे. 220 स्केअर मीटर इतका मोठा हॉल प्रतिक्षालयासाठी आहे.
क्षमता 140 प्रवासी, 68 लाखाचा खर्च
येथील रेल्वे स्थानकावर नव्याने बांधण्यात आलेल्या प्रतिक्षालयात एका वेळी 140 प्रवासी बसू शकतील इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्षालयाचा आकार आहे. या प्रतिक्षालयावर रेल्वेने 68 लाखाचा खर्च केला आहे. 140 प्रवासी थांबू शकतील इतके मोठे प्रतिक्षालय हे भुसावळ विभागातील पहिलेच प्रतिक्षालय आहे.
ऑनलाईन यांची होती उपस्थिती
रेल्वे स्थानकावर झालेल्या ऑनलाईन उदघाटनाच्या वेळी आमदार संजय सावकारे, यात्री सेवा समितीचे केद्रीय सदस्य डॉ. राजेद्र फडके, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य परिक्षित बर्हाटे, डॉ. माधव धांडे, एडीआरएम मनोज सिन्हा, वरिष्ठ परिचलन प्रबंधक आर. के. शर्मा यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी प्रस्ताविक वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी केले. आभार मंडळ वाणिज्य प्रबंधक बी. अरूणकुमार यांनी मानले.

