भुसावळ रेल्वे विभागात प्रथमच महिला कुलीची नियुक्ती


भुसावळ : एरव्ही रेल्वे स्थानकांवर पुरूष कुली म्हणून वावरत असलेतरी भुसावळ विभागातील नाशिक स्थानकावर मात्र प्रथमच महिला कुलीची नियुक्ती करण्यात आली आहे. डीआरएम विवेककुमार गुप्ता, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या नेतृत्वात प्रथमच नाशिक रेल्वे स्थानकावर इंदू एकनाथ वाघ (बिल्ला क्रमांक सात) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंदू यांचे वडील पांडुरंग चरू मानकर हे अनफिट झाल्याने त्यांच्या जागेवर त्यांची विधवा कन्या इंदू यांची नियुक्ती करण्यात आली. नाशिक रेल्वे स्थानकावर पोर्टर कार्य करण्यासाठी त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. वाणिज्य विभागातर्फे नियुक्तीनंतर मुख्य कार्यालय अधीक्षक योगेश नागरे यांनी सन्मान केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !