बोदवड महविद्यालयाला स्वच्छता कार्यरत संस्था म्हणून मान्यता
बोदवड : बोदवड महविद्यालयाला स्वच्छता कार्यरत संस्था म्हणून मान्यता मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केली होती. पंतप्रधानांचे स्वप्न् भारतीयांनी पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असून महाविद्यालयात स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी शासन प्रोत्साहन देते. त्यातलीच एक योजना स्वच्छता कार्यरत संस्था म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परीषद, उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन मंत्रालय व आताचे शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या योजनेंतर्गत कोविड -19 या उद्भवलेल्या महामारीनंतर महाविद्यालयाने केलेल्या तयारीचा उल्लेख केला होता. योजनेचे पाच विभागात सॅनिटायझेशन व हायजीन, वॉटर मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, एनर्जी मॅनेजमेंट व ग्रीनरी असे विभाजन करण्यात आले.
अॅक्शन प्लान इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता
कला वाणिज्य व विज्ञान माविद्यालय बोदवडचे प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी व उपप्राचार्य प्रा.डी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ.क्यू.ए.सी. समन्वयक तथा रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ.अनिल बारी यांनी सदर योजनेचा प्रस्ताव व व पाचही विभागात महाविद्यालयाने राबविलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल क्षणचित्रासह व नियोजन, स्वतंत्र समिती स्थापना तसेच कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालयाने केलेल्या उपाय-योजनाचा प्रामुख्याने उल्लेख करून महाविद्यालयाने प्रस्तावाच्या स्वरुपात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद, उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन मंत्रालय व आताचे शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांना सादर केला. या योजनेचे समिती अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी आहेत तर सदस्य म्हणून डॉ.अनिल बारी, डॉ.रुपाली तायडे, कंचन दमाडे, नितेश सावदेकर व डॉ.गीता पाटील यांची नियुक्ती केलेली आहे. संस्थेने महाविद्यालयाची उलटतपासणी करून त्याची सत्यता पडताळणी करून महविद्यालयास अॅक्शन प्लान इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता दिली. चेअरमन डॉ.वी.जी.प्रसन्नाकुमार यांच्या स्वाक्षरीचे मान्यतेचे प्रमाणपत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले.

संस्था चालकांकडून अभिनंदन
महाविद्यालयाला अॅक्शन प्लान इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता मिळाल्या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मिठूलालाजी आग्रवाल, उपाध्यक्ष अजयाजी जैन, सचिव विकास कोटेचा व सर्व संस्था चालकांनी केले असल्याचे प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र शर्मा यांनी कळविले आहे. आतापर्यंत महाविद्यालयस्तरीय कोरोना प्रतिबंधक, स्वच्छता व व्यवस्थापनापसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांना भारत सरकारने मान्यता देणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्राचार्य अरविंद चौधरी म्हणाले.

