वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन केंद्राने पाळावे


मुक्ताईनगर विधानसभा युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन पाळावे, अशी ागणी मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे युवक काँग्रेसतर्फे नुकतीच करण्यात आली. निवडणुकीच्या काळात युवकांसाठी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले मात्र सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण केले जात आहे त्यामुळे रोजगार निर्मिती कशी होणार ? असा प्रश्न युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे.

नोट बंदीमुळे सर्वच क्षेत्राला फटका
नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणार्‍या कृषी व सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परीणती म्हणजे करोडो रोजगार नष्ट होण्यात झाली. त्यात वस्तू सेवा कराच्या (जीएसटी) चुकीच्या अंमलबजावणीमुळे कुटीर-लघू-मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंदयांचे पार कंबरडे मोडले गेले. याचा परीणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. सरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगाच्या (एनएससी) अहवालानुसार देशात 2017-18 या वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्के असून ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होता तर शहरी भागात 7.8 टक्के राहिला. तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला होता. ानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे 12 ते 13 करोड लोक बेरोजगार झाले असल्याचे सीएमआईच्या पाहणीतून समोर आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या 20 लाख करोडच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी वा लघू-मध्यम उद्यगक्षेत्र यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही.

यांची होती उपस्थिती
मुक्ताईनगरचे तहसीलदार श्याम वाडकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना मुक्ताईनगर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निरज बोराखेडे, युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष अतुल जावरे, सोशल मीडियाचे प्रमुख सादीक खाटीक, अनिल सोनवणे, शुभम बोराखेडे, गौरव पाटील, निलेश पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !