फेकरीच्या इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू


भुसावळ : तालुक्यातील फॅक्टरी येथील रेल्वे गेट जवळ शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या पूर्वी रेल्वेचा धक्का लागून अजय लक्ष्मण बाविस्कर (35) यांचा रेल्वेखाली आल्याने कापले जाऊन मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात स्टेशन व्यवस्थापक पवन उमेश परदेशी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बाविस्कर हे फेकरी येथील रहिवासी आहे. सुरुवातीला त्यांची ओळख पटली नव्हती मात्र नंतर पोलिस तपासात त्यांची ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार, प्रेमचंद सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देत रीतसर पंचनामा केला. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून हवालदार प्रेमचंद सपकाळे पुढील तपास करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !