भादली रेल्वे गेट 15 रोजी बंद राहणार
भुसावळ : जळगाव-भादली दरम्यान असलेले गेट क्रमांक 150 (लेव्हल क्रॉसिंग गेट) 15 सप्टेंबर रोजी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. बंद जळगाव-भादली दरम्यान इंजिनिअरींग विभागाकडून किमी 424/21-23 मधे रेल दुरुस्ती (पॅनल इंटर चेंजिंग) अत्यावश्यक कार्य केले जात असल्याने हे गेट बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

