रावेरात विवाहितेची धूम स्टाईल मंगलपोत लांबवली


रावेर : धूम स्टाईल येत दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 48 हजार किमतीची मंगलपोत चोरुन नेल्याची घटना जुना सावदा रोडवर शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर शहरातील पीपल्स कॉलनी रहिवासी जयश्री प्रकाश पाटील या शुक्रवारी रात्री जूना सावदा रोडने फिरण्यासाठी गेल्या असता रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास अ‍ॅमेझॉन डिलेव्हरी मोटर सायकलवर मागून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाची पोत जबरीने खेचत लांबवली. जयश्री पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !