चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानीत


चाळीसगाव : शहरातील चित्रकार कवी तथा आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलचे कलाशिक्षक दिनेश चव्हाण यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून ग्लोबल बंजारा फाउंडेशनतर्फे या वर्षाचा कला क्षेत्रासाठी दिल्या जाणारा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी नगरसेवक आण्णा कोळी, अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष राठोड, एम.आय.एम.चे कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रकारीतेत विशेष हातखंडा
दिनेश चव्हाण यांचा चित्रकारीतेत विशेष हातखंडा आहे. शीघ्र रेखाटने, पित्रेत, तैलचित्र, नेचर, पोस्टर या प्रकारात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे, शिवाय ते साहित्यिक देखील आहेत. विविध वर्तमानपत्र मासिके अंकात त्यांचे लेख, कथा, कविता, व्यंगचित्रे, कथाचित्रे, प्रकाशित होत असतात. महाराष्ट्रात त्यांनी जवळपास 52 साहित्यकृतींना मुखपृष्ठ दिले आहेत शिवाय अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांना सिम्बॉल देखील त्यांनी तयार करून दिलेत. कोकणातल्या अखिल भारतीय नक्षत्र संमेलनाला त्यांचाच सिम्बॉल होता, त्याचे अनावरण प्रसिद्ध कवी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्याहस्ते झाले होते. दिनेश चव्हाण यांना या अगोदरही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. या यशाबद्दल त्यांचे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व सन्मानीय पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !