किसान रेल्वेतून 1127 टन डाळिंबाची वाहतूक
भुसावळ : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांना लाभदायक ठरलेली किसान रेल, पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी डाळिंब उत्तर भारतात वाहून नेते. आतापर्यंत गेल्या एका महिन्यात एक हजार 100 टना ंपेक्षा जास्त वाहतूक झाली आहे. आठवड्यातूनतीन दिवस किसान रेेल्वे धावत असल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. किसान रेल्वेद्वारे डाळींब, शिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, जिवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक महाराष्ट्रातील सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड, नाशिक, मनमाड या भागांतून केली जात आहे.
1137 टन डाळींबाची वाहतूक
किसान रेल्वेने आतापर्यंत वाहून नेलेल्या एकूण नाशवंत मालापैकी एक हजार 127.67 टन डाळिंबाची वाहतूक केली आहे ज्याचे प्रमाण एकूण नाशवंत मालाच्या सुमारे 61 टक्के आहे. किसान रेल्वे 7 ऑगस्ट 2020 रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूरपर्यंत विस्तारीत करण्यात आली आणि त्यानंतर सांगोला/पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल त्री ाप्ताहिक म्हणून सुरू असून तिला शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, नाशवंत वस्तूंची ताजा डिलीवरी करणे सुलभ झाले आहे शिवाय रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी ही रेल्वे असल्याने शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा आहे. ताज्या वस्तू कमी वेळात बाजारात जात असल्याने, फळांची मागणीत वाढ होत आहे व त्याचा फायदा शेतकर्यांना होत असल्याबद्दल अखिल महाराष्ट्र डाळींब उत्पादक सशोधन संघ, पुणेच्या पदाधिकार्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


