राज्य पोलिस बॉइज संघटना जिल्हा मीडिया प्रमुखपदी सलाउद्दीन अदीब
भुसावळ : राज्य पोलिस बॉइज संघटना जिल्हा मीडिया प्रमुखपदी भुसावळ येथील पत्रकार सलाहुद्दीन अदीब यांची तसेच भुसावळ तालुका वाहतूक आघाडी उपाध्यक्षपदी नईम गयासोद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पोलिस बॉइज संघटना जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोहसीन शरीफ काझी व जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांनी ही नियुक्ती केली असून उभयंतांना नियुक्ती पत्र देऊन जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोहसीन शरीफ काजी यांनी सन्मान केला.

