मध्य रेल्वेतर्फे 23.225 दशलक्ष टन मालवाहतूक


भुसावळ : अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या 1.67 लाख वॅगन्सची वाहतूक करण्यात आली. उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मालाची वाहतूक वेळेवर करण्यासाठी रेल्वेने कोविड-19 काळात लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. 23 मार्च 2020 ते 9 सप्टेंबर 2020 या काळात मध्य रेल्वेने 23.225 दशलक्ष टन माल वाहतूक केली आहे.

या वस्तूंची झाली वाहतूक
मध्य रेल्वेने 23 मार्च 2020 ते 9 सप्टेंबर 2020 पर्यंत नऊ हजार 279 मालगाड्या चालविल्या व यातून चार लाख 42 हजार 944 वॅगन्स भरून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व पोलाद, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची मालवाहतूक करण्यात आली. या कालावधीत दररोज सरासरी दोन हजार 590 वॅगन्सची मालवाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या एक लाख 67 हजार 23 वॅगन्स विविध वीज प्रकल्पांपर्यंत नेल्या. तसेच अन्नधान्य आणि साखर पाच हजार 155 वॅगन्स, शेतकर्‍यांच्या हितासाठी 20 हजार 543 खतांची वॅगन्स व सहा हजार 555 कांद्याचे वॅगन्स; पेट्रोलियम पदार्थांचे 43 हजार 824 वॅगन्स, लोह आणि स्टीलच्या 11 हजार 747 वॅगन्स, सिमेंटची 28 हजार 299 वॅगन्स, एक लाख 37 हजार 760 कंटेनर वॅगन्स आणि सुमारे 22 हजार 38 डी-ऑईल केक आणि संकीर्ण वस्तूंचे वॅगन्स वाहून नेले. मध्य रेल्वेवर क्षेत्रीय स्तरावर आणि विभागीय स्तरावर बहु-अनुशासित व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) ची स्थापना रेल्वेने केली आहे. वरीष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असलेला हा घटक रेल्वेमार्फत अधिक वाहतूक संधी निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !