सामाजिक जवाबदारी स्वीकारल्याशिवाय कोरोनाविरुद्धची लढाई जिंकणे अशक्य


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत : यावल ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सीजन पाईप लाईनचे लोकार्पण

यावल : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाढती रूग्ण संख्याही आपल्यासाठी चिंतेचा विषय असुन आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी स्विकारल्या शिवाय कोरोना महामारीच्या विरूध्द युद्ध जिंकु शकणार नाही. शासनाच्या संकल्पनेतुन राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमास शहर व गाव पातळीवरील नागरीकांनी प्रतिसाद देवुन ही आरोग्याच्या दृष्टीने या मोहीमेस आपण स्वताः सहभाग घेवुन यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सीजन पाईपलाईनच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

एकजुटीने संकटावर मात : डॉ.बी.एन.पाटील
संकटासमयी नागरीकांचे जीव वाचविण्यासाठी आर्थिक सहकार्य करणार्‍यांना दानशूर नव्हे तर जिीनदाते म्हणावे लागेल. नागरीक आणि प्रशासनाच्या एक जुटीने आपण संघर्ष करून कुठल्याही संकटावर विजय मिळवु शकता, असे जिल्हा परीषदेचेे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी आपले विचार मांडतांना सांगितले.

यांची होती उपस्थिती
शनिवारी यावलच्या तहसील कार्यालयात यावल ग्रामीण रुग्णालयात लोकवर्गणीतून बसाविण्यात आलेल्या ऑक्सीजन पाईपलाईनच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, काँग्रेसचे जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी उपविभागीय प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ज्या दानशूरांनी आर्थिक मदत केली अशा दानशुरांचा जिल्हाधिकारी व जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मंडळाधिकारी जे.डी.बंगाळे यांनी तर प्रस्तावना प्राांधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी मांडली तसेच उपस्थितांचे आभार तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी मानले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते यावल ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सीजन पाईप लाईन बसविलेल्या 30 बेड रूमचे फित कापुन लोकार्पण करण्यात आले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुवर, यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बर्‍हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी बारेला, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांच्यासह महसुल व आरोग्य प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !