अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एकाविरुद्ध गुन्हा


जळगाव : बकर्‍यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रुपेश ज्ञानेश्वर सपकाळे (रा.कुर्हाडदा, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील कुर्‍हाडदा येथील 17 वर्षीय मुलगी 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गावातील वाड्यात बकर्‍यांना चारा टाकण्यासाठी गेली असता गावातील संशयित आरोपी रूपेश ज्ञानेश्वर सपकाळे (कोळी) हा नदीकडून पायी जात असतांना त्याचे लक्ष मुलीकडे गेले. त्यावेळी त्यांनी मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. घडलेली घटना पिडीत मुलीने आपल्या आईवडीलांना सांगितल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी रूपेश सपकाळे याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !