जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 667 रुग्ण आढळले


24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 38 हजार 836 रुग्णांना कोरोनाची लागण

जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल 667 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 38 हजार 836 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 27 हजार 749 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत 971 रुग्णांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 538 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 150
जळगाव ग्रामीण 15
भुसावळ 40
अमळनेर 32
चोपडा 61
पाचोरा 28
भडगाव 05
धरणगाव 47
यावल 18
एरंडोल 29
जामनेर 112
रावेर 16
पारोळा 55
चाळीसगाव 19
मुक्ताईनगर 29
बोदवड 06
अन्य जिल्हा 05




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !