धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित कोरोना पॉझीटीव्ह
धुळे : धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित हे कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पंडित यांच्यावर शहरातील मालेगाव रोडवरील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला तर बॉडीगार्ड आणि वाहन चालक यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे.


