भुसावळातील एस.बी.आय.बँक कर्मचारी कोरोना संशयीत


बँकेचे कामकाज ठप्प : ग्राहक आल्या पावली माघारी परतले

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील स्टेट बँकेतील मुख्य शाखेत सात कर्मचारी कोरोना संशयीत असल्याने सोमवारी सकाळपासून कामकाज ठप्प झाले असून ग्राहकांना आल्या पावली परत फिरण्याची वेळ आली. सोमवारी सकाळी बँकेचच्या मुख्य प्रवेशव्दाराबाहेर ग्राहकांनी गर्दी केली मात्र त्यांना आत सोडण्यास मज्जाव करण्यात आला. सुरक्षा रक्षकांकडून मात्र ग्राहकांना कारण विचारल्यानंतरही सांगण्यात आले नाही. शहरातील जामनेररोडवरील एसबीआयच्या मुख्य शाखा असलेल्या सात कर्मचारी कोरोना संशयीत असून खबरदारी घेण्यासाठी सोमवारी सकाळपासुन बँकेचे व्यवहार बंद ठेवण्यात आले. याबाबतची सविस्तर माहिती देण्यास शाखा व्यवस्थापकांनी नकार दिला आहे. तसेच प्रवेशव्दार बंद ठेवण्यात आले होते. सुरक्षा रक्षक ग्राहकांनाही पूर्ण माहिती देत नव्हते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !