पंतप्रधानांचा वाढदिवस जनहिताची कामे करून करा साजरा


भाजपा किसानसेल उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके यांचे रावेरात आवाहन

रावेर : देशहिताचे निर्णय घेणारे व गरीब-गरजु जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 व्वा वाढदिवस जनहिताचे कामे करून साजरा करायचा आहे तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधीनीं येत्या 14 ते 24 तारखेच्या दरम्यान साजरा करायचा असल्याचे प्रतिपादन भाजपा किसानसेल उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके यांनी भाजपाच्या बैठकीत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व पंडित दिनदयाल उपध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रावेर कृषी उपन्न बाजार समितीत भाजपाची बैठक झाली.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, संजय गांधी निराधार माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, पंचायत समिती उपसभापती जुम्मा तडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समिती सदस्य योगीता वानखडे, माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ नेमाडे, माजी जिल्हा सरचिटणीस विजय धांडे, महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस.पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, महेंद्र पाटील ,राहुल महाजन, भास्कर सरोदे, कैलास पारधी, नितीन पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीची प्रस्तावना भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी केली.

यांनी बैठकीला फिरवली पाठ
भाजपाच्या बैठकीला लोकप्रतिनिधी मधून जिल्हा परीषद सदस्या नंदा पाटील, पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, धनश्री सावळे, कविता कोळी आदी लोकप्रतीनिधींनी बैठकीला पाठ फिरवली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !