नोकरीला लावून देण्याच्या नावाखाली साडेनऊ लाखात फसवले


भुसावळ : नोकरीला लावून देण्याच्या नावाखाली शहरातील जावेद रफीक तडवी (नेमाडे कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयीत आरोपी फिरोज सिकंदर तडवी (लक्ष्मी नारायण, विवेकानंद शाळेसमोर, भुसावळ) याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 18 जुलै ते 2013 ते 15 डिसेंबर 2013 दरम्यान हा गुन्हा घडला तर आरोपीने नऊ लाख 30 हजारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तक्रारीचा आशय असा की, आरोपी फिरोजने तक्रारदाराचा विश्‍वास संपादन करीत आपले वडील तहसीलदार व उपजिल्हाधिकारी आहे. त्यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुख्याध्यापकांशी ओळख असल्याचा व्विास देत तक्रारदाराचा भाऊ सलीम रफीक तडवी यांना नोकरी लावून देण्याचे आमीष देत 9 लाख 30 हजार रुपयात फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक मंगेश गोटला पुढील तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !