भुसावळातील खून प्रकरण : पाचवा पसार आरोपी जाळ्यात
भुसावळ : जुन्या वादाच्या कारणातून पाच जणांच्या टोळक्याने सुमारास खडका रोडवरील पुलाखाली अल्तमश रशीद शेख (21, बाबला हॉटेलजवळ, जाम मोहल्ला, भुसावळ) या तरुणाची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी तिघा आरोपींना सुरुवातीला अटक करण्यात आली होती तर नंतर शेख आमीर शेख युसूफ (18, रा.पंधरा बंगला) यास सोमवारी रात्री अटक केल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजता पाचवा पसार आरोपी आदर्श उर्फ आदु मनोहर गायकवाड (19) यास अटक करण्यात आली.
पाचही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
शेख अल्तमश या तरुणाच्या खून प्रकरणी शेख समीर शेख युसूफ (19), शेख शाहरूख शेख युसूफ (27, दोन्ही रा.रींग रोड, भुसावळ) व समीर शेख रहेमान शेख (18, पंधरा बंगला, भुसावळ), शेख आमीर शेख युसूफ (18, रा.पंधरा बंगला) या चौघा आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर बुधवारी पहाटे आदर्श उर्फ आदु मनोहर गायकवाड (19) यास अटक करण्यात आल्याने अटकेतील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व निरीक्षक दिलीप भागवत व प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, नाईक रवींद्र बिर्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, कृष्णा देशमुख आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

