शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक झाल्यास पोलिस ठाण्यात द्यावी तक्रार


फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांचे आवाहन

रावेर : कोरोना महामारीमध्ये आधीच शेतकरी अडचणीत असतांना व्यापा-यांनी शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक करू नये तसेच फसवणूक झाली असल्यास संबंधीत पोलिस स्थानकात तक्रार देण्याचे अवाहन उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतक-यांना केले आहे. रावेर व यावल तालुक्यात शेतकर्‍यांकडून केळी किंवा शेतीवर आधारीत इतर पिके घेण्यासाठी बाहेर तालुक्यातून व्यापारी येऊन संबंधीत शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करून केळीच्या पिकाची कापणी करतात व संबंधीत शेतकर्‍यांना चेक देतात परंतु शेतकरी जेव्हा चेक विड्राल करायला जातो तेव्हा त्या धनादेशाचा अनादर होवून शेतकर्‍यांची फसवणूक होते. ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणी यावल पोलिस स्टेशन गुन्हा देखील झाला आहे. अशाच पद्धत्तीने इतर शेतकर्‍यांचीदेखील फसवणूक होऊ नये तसेच झाली असल्यास संबंधित पोलिस स्टेशनला व्यापार्‍याविरुद्ध तक्रार द्यावी, असे आवाहन फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतकर्‍यांना केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !