जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 743 रुग्ण आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 40 हजार 908 वर : 24 तासात 19 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी 743 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या तब्बल 40 हजार 908 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 19 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1027 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 29 हजार 891 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात तब्बल 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 200
जळगाव ग्रामीण 25
भुसावळ 43
अमळनेर 56
चोपडा 65
पाचोरा 04
भडगाव 46
धरणगाव 23
यावल 14
एरंडोल 47
जामनेर 61
रावेर 27
पारोळा 34
चाळीसगाव 66
मुक्ताईनगर 16
बोदवड 09
अन्य जिल्हा 07




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !